बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा
1 min
15
दुःख सोसत असते
संस्कृतीचा जपे ठेवा
समाधानी अंतरी ती
बाईपण भारी देवा ----१
झिजे चंदनासमान
संकटात घेई धाव
रूप बहिणीचे माया
तिच्या मनी कधी घाव ---२
पाणी तिच्याही नयनी
तरी मधुर ती वाणी
माय माऊली निस्वार्थी
नेहमीच स्वाभिमानी ---३
पान्हा हृदयी जिच्या असे
आयुष्यात तो संघर्ष
शांत राहून नेहमी
करीतसे ती उत्कर्ष ---४