Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

स्त्रीमन

स्त्रीमन

1 min
16


तिलाही थोडे समजून घ्या

तिलाही असतेच ना मन

भावना तिच्या समजून घ्या

कर्तव्यदक्ष असते ना तीपन


त्यागाची मूर्ती असते ती

माहेर आपले सोडून येते

सगळ्यांची मने जपत असते

तिला का कोणी समजून घेते?


आपल्या घरासाठी ती

राब राबत असते नेहमी

तिच्या घरात असण्याने

कधी पडत नाही कोणाला कमी


आई, पत्नी, बहीण,आजी,मुलगी

सगळ्या भूमिका पडते पार

आयुष्यात कितीही संकटे येवू द्या

ती कधीच मानत नसते हार


गृहिणी जरी असली तरी

घरातले बघते ती सर्व

दिवसभर काम निस्वार्थीपणे

कधीच नसतो तिला गर्व



Rate this content
Log in