सावित्री बाई फुले
सावित्री बाई फुले
1 min
7
तू वात होऊन ज्योतीची
अन प्रकाश आम्हाला दिलास
शिक्षणामुळे आमच्या सुंदर
जाण्याला अर्थ तू आणलास।
चार भिंतीतले अस्तित्व होते
आमचे फक्त चुल आणि मूल।
देऊनी लेखणी हातात आमच्या
साक्षरतेचे फुलवले फुल।
ज्योतिबांची अर्धांगिनी तू
वंदन तुला तुझ्या धाडसाला
आमच्या या दिशाहीन जीवनाला
तुझ्यामुळेच अर्थ आला।
देऊनी लेखणी हातात आमच्या
बनविलेस तू आम्हाला साक्षर
वंदन त्या स्वाभिमानी मातेला अन
चरणी माथा तुझ्या निरंतर