Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री जन्मा तुझी कहाणी

1 min
16


जन्म तुझा होताच ग

म्हणे जन्मली कारटी

नाके डोळे मुरडीती

 होती आपले पारखी ------१


आई घेई ग कुशीत 

न्याहळते तुझे रूप

होई आनंद तिलाच

बघा म्हणे छान खूप -----२


बाबा देतो धीर तिला

 म्हणे कन्या धन पेटी

नको विचार तू करू

लेक माझी गुणी मोठी ---३


तीच खरी भाग्यलक्ष्मी

करा तिचाच आदर

स्त्रीचे जीवन कसे हे

चार ओळीत सादर ----४


प्रवासच खडतर

स्त्रीचा जन्म ही कहाणी

जीवनात आणीबाणी

आहे ना केविलवाणी -----५


झाली अबला सबला

सुधारले ते शिक्षण

गुण चांगले पाडोनी

करी निर्भिड ती मन ----६


मोठी पदवी घेवून

चूल मुल सांभाळते

तिचे स्त्री जीवन तिला

आहे सुंदर कळते -- ७


खांदा लावुनी खांद्याला

 पुढे क्षेत्रात ती सर्व

अभिमान नसे तिला

नसे कुठलाच गर्व --- ८


तीच स्वतःला सावरी

 उभी असे संकटात

परिस्थिती कोणतीही

करी ती त्यावर मात --- ९


स्त्रीजीवन अनमोल

बाळा सृष्टीचे दर्शन

धन्य माता तीच असे

निस्वार्थीच असे मन ---१०


Rate this content
Log in