रूपे तुझी अनेक
रूपे तुझी अनेक
1 min
4
वात्सल्य सिंधू आई
सासर माहेर जपते
हसत खेळत तूच
आपल्या संसारात रमते
रूप बहिणीचे देई माया
संकटात असे उभी नेहमी
प्रेमळ मायाळू असते
कधी पडू देत नाही कमी
तुझ्यामुळे असते ग
घराला नेहमी घरपण
अर्धांगिनी असते तू
जपत असते पतीचे मन
दुःखात देखील तू हसते
नयनी अश्रु नेहमी पुसते
तुझ्या भावना न कळे कुणा
तरीही क्षणभरच रुसते