Swarupa Kulkarni

Romance Inspirational

4  

Swarupa Kulkarni

Romance Inspirational

कृष्णसखा!!

कृष्णसखा!!

3 mins
13


   " तू कृष्ण कधी बघितलायेस का गं?"  सलोनी तिला विचारत होती. सईने क्षणभर तिच्याकडे नी क्षणभर मनातल्या कन्हैय्याला पाहून घेतले.." सलोनी, अगं श्याम तर माझ्या मनात रहातो, तनात रहातो..मी तर त्याला स्वतःपासून वेगळं समजतच नाही गं..तू विचारतेस बघितला का? अगं तोच तर चालवतोय हा देह..तुझा देह , माझा देह सर्वांचा देह..त्याला माझ्यातून ह्या सगळ्यातून वेगळं कसं काढू? सांग ना"  

सलोनी हसत म्हणाली, " अच्छा म्हणजे तुला नाही भेटलाय अजुन"..

सई म्हणाली," अगं तसं नाही गं". 

सलोनी म्हणाली,"मग का नाही आजकाल हसत, नाचत गात तू मंदिरात..तुझ्याशिवाय तो मंदिरातला भजनाचा कार्यक्रमही सुना आहे सई..तू नसलीस की मन उदास होतं.."

" तू कश्शी मनकवडीयेस गं, कसं कळतं तुला माझ्या मनीचं गुज..तूझं खरंय हर एकांती मी त्याचाच विचार करते पण अजुनही मन स्थिर नाही. त्याला सगुणरूपात भेटावं, पहावं ही सुप्त इच्छा मध्येच डोकं वर काढते बघ..अश्शावेळी नको तो श्रृंगार, नको ते जेवण, नको ते भजन, काही काही नको मला..तोच हवा हीच इच्छा तीव्र होते..राधेला कृष्णच हवा ना सलोनी..त्याच्याशिवाय अन्नपाणी नको वाटतं गं" 

 सलोनी-" होय काय मग मगाशी कशाला अध्यात्माचे धडे देत होतीस..तोच सर्वत्र तर मग का हवा सगुणरूपात? सांग..? तूझं हे कान्हावरचं प्रेमच बोलतंय सई..तू कान्हाच्या पूर्ण प्रेमात बुडालीयेस..प्रेमवेडी राधा झालीयेस अगदी"

  सईच्या डोळ्यात ते ऐकताच अश्रू गोळा झाले नी सरसर थेंबांची धार लागली..


  सईच्या कोवळ्या अंतःकरणात श्याम बंदिस्त होताच पण जगाला काय माहित तिची अवस्था. ती कान्हावर प्रेम करत होती..अगदी जीवापाड! तो तिचा भावविश्वातला जोडीदार होता..तिचा मुक प्रणय त्याच्याशी होई..तो तिला कधी भेटेल ही आस तिला छळे..पण दुसरं मन तिला समजावत होतं की सई राधा कान्हाकडून काहीच अपेक्षा करत नसे.अगदी प्रत्यक्ष भेटण्याची देखील नाही..अर्थात त्याच्या विरहात तीही जळत असे पण तीने त्याला बंधन घातले नाही कधी.

  सईला वाटे माझ्यासारख्या सामान्य भक्ताला श्याम कधी प्रत्यक्ष भेटेल का? तो तर मीरेचा, कधी राधेचा ..सुरदासाचा तर कधी कबीराचा ...माझा होईल का कधी,???

सई चा श्याम कधी होईल का? तो तर वैकुंठाचा मालक, सर्वसत्ताधीश...जगच्चालक..

श्रीहरी... मी तर एक पापी संसारकीडा..माझी आठवण त्याला होईल का? मी कधी कृष्णाची राधा होईल का??

सईची विचार करता करताच भावसमाधी लागली.

  समोर कान्हाची सावळी मुर्ती उभी होती.. तो हसत होता उमललेल्या फुलासारखा..ती बावरली, हा माझा कान्हाच का? तो पुढे येऊन तिचा हात हातात घेऊन तिला झोक्यावर बसवत मुग्ध हसला..अलगद कटीची बासरी काढुन अत्यंत तन्मयतेने सूर चेतवू लागला.सई ते ऐकून देहभान हरपून गेली..सगळीकडे निळा प्रकाश पसरलेला...कान्हा बासरी वाजवतोय की मीच बासरी झाले नकळे..सईला क्षणभर संपूर्ण जग कान्हाच आहे व आपल्या अंतरंगातही कान्हाच आहे हे जाणवले..ती कान्हाच्या सुरावटींनी बेभान झाली..नकळत तिच्या पायी घुंगरू बांधले गेले नी तासन् तास ती नृत्य करत राहिली..राधाच बनली..कृष्ण बासरीतुन सूर प्रसवत होता ती बेभान नृत्य करत होती..अखेर कान्हाची बासरी थांबली नी सई कान्हाच्या चरणांशी येऊन नतमस्तक झाली...कितीतरी चुकार क्षण गेले असतील. तीने वर पाहिले तर ...तर कान्हा नव्हताच..झोपाळा हलत होता फक्त! ती समजायचं ते समजली ...कान्हाने अशाप्रकारे तिची इच्छा पुरवली होती...सई मुग्धपणे ते मंतरलेले क्षण पुनःपुन्हा आठवत राहिली..प्रेमवेडी राधा बनुन पुनःपुन्हा नृत्य करत राहिली..आता तिचे मन कान्हाचेच घर बनले...ती जशीजशी त्याला आठवू, स्मरू लागली कान्हा तसातसा तिला भेटत राहिला..भक्तासाठी वैकुंठही त्यागून लीला करतच राहिला..

   एक दिवस ती सकाळीच पुजा करत होती..ती त्यात तन्मय झाली होती..तिला क्षणभर मागून कोणीतरी आवाज देतय असं वाटलं...तिने पदर सावरत मागे वळून पाहिलं...तो आला होता..तो मुरलीधर..तिचा जीवनसखा...तीचा नीलमणी..ती चटकन उठली.त्याला पाहून हसली..तो टपोरे डोळे तिच्याकडे रोखून हसतच म्हणाला," काय झाली का पूजा?" सई काय बोलावं हे उत्तर न सापडून गप्प होती. कान्हाने तिचा हात पकडला.."चल यायचं ना घरी..मी तुला न्यायला आलोय..." सई मुग्धपणे हसली..नी त्याच्या हाती हात देत क्षणाचाही विलंब न करता त्याच्यासोबत निघाली, मागे वळूनही न बघता सई कृष्णासोबत निघाली..तो तिचा प्राणाधार आज सगुण साकार होऊन तिला चल म्हणत होता..पुन्हा कधिही परतुन न येण्यासाठी...


सारांश-कारण, तो जगाचा मालक असला तरी तिचा कृष्णसखाच होता..जशी भक्ती तसा ईश्वर!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance