Swarupa Kulkarni

Romance

3  

Swarupa Kulkarni

Romance

प्रिती

प्रिती

6 mins
150


वाटेवर पारिजातकाची फुले विखूरली होती..त्याचा सुगंधी दरवळ वाटेवरच्या प्रत्येकाला गंधाळून टाकत होत्या..बस स्टॉपजवळ अजय कितीतरी वेळ तिची वाट पहात ताटकळत उभा होता..ती आता कशी दिसत असेल या विचारांनी त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले..शाळेत असतांना पुढच्या बेंचवर बसणारी ती आताही तश्शीच लांब वेण्या घालून त्यावर गुलाबाचं फुल लावत असेल का? तीची नेहमी खळखळून हसण्याची सवय आजही तशीच असेल का? अशा विचारातच तो गुंगला होता..इतक्यात बस समोर येऊन थांबली अन् तो भानावर येऊन सावधपणे तीच्या प्रतिक्षा करू लागला..एक एक करत प्रवासी उतरत होते अन् ती दिसली...हजारो पक्षी क्षणभरात इतस्ततः उडून जावे किंवा हजारो फुलपाखरे एकाच वेळी रंगीबेरंगी फुलांवर उतरावी तसं काहिसं त्याचं मन तिच्या पहिल्याच दर्शनाने पाखरू पाखरू झालं...वेड्यासारखा तो तिला पहातच राहिला...

          'मधुरा'...त्याने अतिशय आवेगाने तो शब्द उच्चारला...

    तीही क्षणभर बावरली की इतक्या जोरात कोण हाक मारत आहे? अन् पुढच्याच क्षणी तो दिसला..अगदी तस्साच उंच, रूबाबदार, प्रथमदर्शनीच प्रेमात पाडणारं व्यक्तीमत्व..

   मधुरा सुंदर सलवार कमिज घातलेली अन् आपल्या मोकळ्या केसांना सावरत पुढे आली.. तिची व त्याची दृष्टादृष्ट झाली..अन् क्षणात ती संकोचली..कारण तो जणू एखाद्या फिल्मी हिरोसारखाच तिच्याकडे प्रेम कटाक्ष टाकून हसत होता...

   अजय...तो तर तिच्या बालपणीचा हिरो , तो तस्साच आहे आजही मिश्कील, हसरा,रूबाबदार...तिने हसतच त्याच्याकडे बघितले..तोही हसला..त्याने पुढे येऊन तिच्या दोन्ही बॅग हातात घेतल्या... अजयने इथे कार मुद्दाम आणली नव्हती..कारण त्याला तिच्यासोबत वेळ घालवत चालत जायचं होतं..

    मधुराला इतकावेळ आपण किती गर्दीत सामान सावरत गाडीत बसून आलोय ह्या सगळ्याचा विसर पडला होता..

  अजय तिला म्हणाला ' अगदी तश्शीच स्माईले तुझी मधुरा,मैत्रिणीशी बोलतांना असायची तशी'.. मधुरा खळखळून हसली...अरे याला आपण अजुनही आठवतो..थोडक्यात लहानपणापासून एकमेकांना आवडणारे ते दोघे रोमिओ ज्युलिएट होते..पण पुढे त्यांच्या दोन्ही कुटूंबांनी गाव सोडून वेगवेगळ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला व दोघांची ताटातुट झाली...आज अनेक वर्षांनी अजय व मधुरा परत त्याच गावात भेटत होते..तेही योगायोगाने...मधुराच्या काकूने हे स्थळ तिच्यासाठी सुचवलं होतं..आणि तिचा फोटो पाहून 'अरे हीच ती आपली ड्रिमगर्ल' नेकी और पुछपुछ अशी अजयची भावना झाली..तो संपूर्ण आठवडा ह्या भेटीची सुखस्वप्ने मनात घोळवत राहिला होता..मधुराने इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरवात केली पण ती मनातुन कमालीची लाजली होती..अजयचीही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती..पण चेहऱ्यावर काही न दाखवता तो व ती जुन्या मैत्रीची व गावाच्या आठवणी काढून बोलत चालले होते..

  अजय हैद्राबादला सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्दयावर काम करत होता.तर मधुरा मुंबईत राहणारी स्कुल टिचर होती..थोडाच वेळ पायी चालण्यात गेला असेल नी त्यांना आपली शाळा लांबून दिसली..मधुराने आपण शाळेत जायचं का ? असा सहेतुक कटाक्ष अजयकडे टाकला..अजयही लगेच तयार झाला..पण सामान कुठे ठेवावे ही अडचण होती म्हणून अजयने मधुराला आपण उद्या शाळेला भेट देऊ असे सांगुन आपल्या जुन्या घरी तिला नेण्यासाठी ऑटोरिक्षा थांबवली..ते दोघे रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याने कुठे जायचे म्हणून विचारले..अजयने साखरवाडी हे नाव सांगताच रिक्षा जोरात त्या दिशेने निघाली...रस्ताभर ती आपल्या इतक्या जवळ बसून आपल्यासोबत प्रवास करतिये हे फारच सुखद होते..तिही अवघडूनच बसली होती.पण वरवर मनमोकळेपणाने बोलत ती कितीतरी विषयांवर भरभरून बोलत होती..तोही मला खूप काही समजत आहे हा भाव चेहऱ्यावर ठेऊन मनातुन मात्र हा प्रवास कध्धीच थांबू नये या विचारात जणू स्वर्गसुखात डुंबत होता...

    हो हीच ती त्याची पहिली प्रित ..मधुरा..

  थोड्यावेळातच रिक्षा थांबली..

   बोलण्याचा धबधबा थांबला ...अजय बावरून इकडे तिकडे बघत बसला..तेंव्हा रिक्षावाला पैसे मागू लागला..अजयने कसबसं स्वतःला सावरत त्याला ५०० ची नोट दिली..आणि तो हसतच तिचे सामान घेऊन चालतांना तिला म्हणाला, ' काही गोष्टींचं मुल्य पैशात करता येत नाही ना' आणि मागे वळून रिक्षावाल्याला डोळा मारत तो गेटकडे वळला..मधुरा या अनपेक्षित सुखद प्रसंगावर न बोलता हसून त्याच्याकडे बघतच राहिली...खरंच हा किती लोभस नी प्रेमळ व्यक्ती आहे, मी मात्र पैसे देतांना किती वेळ विचार केला असता...ती त्याच्या प्रेमळ वागणुकीने शहारली..तो व त्याचा सहवास संपूच नये अशी हळूहळू तिची अवस्था होऊ लागली..येणारा प्रत्येक क्षण तो व ती प्रेमाने नुसते न्हाऊन निघत होते...कारण त्यांची जुनी मैत्री परत बहराला आली व ऐन तारूण्यात प्रेमाचा वसंत फुलवून गेली...

    हसतच तीने त्याच्या जुन्या बंगल्यात प्रवेश केला..तो बंगला भाडेकरूंकडे असल्याने स्वागताला त्या कुटूंबातील मीना मावशी पुढे आल्या..दोघेही त्यांच्या वयाचा मान ठेऊन पाया पडले...त्यांनी तोंडभरून दोघांनाही आशिर्वाद दिले..त्यांनी मधुराशी संवाद साधला..अजयने मावशींना सगळी स्टोरी सांगितली..मधुरा संकोचून गेली कारण तिचा लाजरा स्वभाव आणि समोर अनोळखी मावशी..पण त्यांनी हसतच तिचे कौतुक केले व अजयला अगदी साजेशीच आहेस बरे तू अशी पुष्टी जोडली..अजय तर हरखून गेला...मधुराकडे प्रेमाने बघत हसला..तीही हसली..

   दोघेही फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले..मीनामावशींनी स्वयंपाक केलेलाच होता..हसतखेळत जेवण पार पडले..इतक्यात दारावरची बेल वाजली.. मीनामावशींनी दरवाजा उघडला.. दारात प्रथमेश उभा होता..अजयने हसतच त्याला जेवायला बोलावले...प्रथमेश म्हणजे मधुरा व अजयचा क्लासमेट..प्रथमेशची पहिली ड्रीम गर्ल मधुराच होती..पण हे सत्य फक्त मधुरालाच माहित होतं..अजयला याची काहिच माहिती नव्हती..ते तिघेही जेवण करून बाहेर आले..प्रथमेश मनातल्या मनात चरफडत होता की मधुरा अजयची होणार..काहिही झालं तरी हे लग्न होऊ द्यायचं नाही असा निश्चय करून त्याने मनात डावपेच आखले..अजयचा पत्ता कट करण्याचा खुनशी डाव तो मनात पक्का करून तिथून निघाला व थेट त्याच्या घरी आला..त्याने गावातल्या तगड्या ५-६ गुंडांना बोलावून हे काम तमाम करण्याची सगळी योजना बनवली..रात्र होताच त्याने अजयला चौकात बोलावले..एव्हड्या रात्री प्रथमेशने मला का बोलावले असेल हे न कळून तो मधुराशी बोललाही..ती अजयला जाऊ नको म्हणून बजावत होती..कारण प्रथमेशचा रागीट स्वभाव तिला शाळेपासून माहीत होता..अजयला याची कल्पना द्यावी असे तिला वाटू लागले...ती तसे बोललीही पण अजयला तिकडे जाण्यात काहीच वावगे वाटेना..सरळ बाईक काढून तो जॅकेट घालून 'आत्ता येतो' म्हणत निघाला..

   गावात अजून काही भागात अंधारच होता..तुरळक वीजेचे खांब सोडले तर रस्त्यांवर अंधूक प्रकाश होता..बरेच रस्ते मागे टाकत तो चौकाजवळ आला...पण त्याला लांबूनच हातात दांडूके, साखळ्या असे अवजार घेऊन उभे असलेले गुंड दृष्टीस पडले..अजय सावध झाला..म्हणजे दाल में कुछ काला है, अजयने तशीच बाईक मागे वळवली व वेगात बाईक चालवत निघाला.. प्रथमेशही गुंडांसोबत त्याचा पाठलाग करत मागे निघाले..अजयला बाईक वेगात चालवण्याची सवय होती..पण आज त्याची परिक्षाच होती..देवाचे नाव मनात ठेवून तो वेगात बाईक चालवत राहिला..प्रथमेशने गाडीचा वेग वाढवत त्याला गाठले..चारीबाजूंनी गुंडांनी त्याला वेढले...अजयला प्रतिकार करण्याची संधी न देता प्रथमेशने दोन फटक्यात त्याला बाईकवरून खाली पाडले..अजय  प्रतिकार करण्यासाठी प्रथमेशवर धाऊन गेला पण गुंडांनी त्याला पकडले..त्यांच्यात जोरदार झकडपकड झाली..अजयला गुंडांनी खूप चोप दिला...तो जखमी होऊन रस्त्यात विव्हळत पडला..प्रथमेशने त्याला जवळ जाऊन सांगितले, मधुराच्या नादी लागू नकोस.. ती माझीये..अन् जोरात त्याच्या छातीवर प्रहार केला..अजय अर्धमेला होऊन निपचित पडला..तेव्हड्यात पोलीसांच्या गाडीचा सायरन कानी पडला...प्रथमेश व गुंड वेगात तिथून सटकले...

    ताबडतोब पोलीसांनी अजयला इमर्जन्सी व्हॅनमध्ये टाकून जवळच्या इस्पितळात अॅडमीट केले गेले..इकडे मधुराला कळताच ती दुःखावेगाने दवाखान्यात पोहोचली...झालेला प्रकार कळताच तीला प्रथमेशची घृणा आली...ती ओक्साबोक्शी रडली..मीनामावशी धीर देत होत्या..अजयचे ह्रदयाचे ठोके कमी पडत होते..डॉक्टरांनी प्राणपणाने खिंड लढवली..अजयचे ठोके पुर्ववत झाले..मधुराने देवाचे आभार मानले...पण धोका अजुनही टळला नव्हता..ती रात्र फार महत्वाची होती..रात्रभर रडून रडून मधुराचे डोळे सुजले होते..पहाटेच कधितरी डॉक्टरांच्या चाहूलीने ती भानावर आली...अजय मरता मरता वाचला होता..मधुरा हळूच त्याच्याजवळ गेली..त्याला पाहून गहिवरली..डॉक्टरांनी काळजीचे कारण नाही असे सांगताच तीला रडू आवरेना..आपलं काहितरी पुण्यच म्हणून आजचा दिवस उगवला हे तिला मनोमन वाटलं.किती काहीही झालं तरी तो तिचा प्रियकर व होणारा नवराच होता..तिला जास्त प्रतिक्षा करावी लागली नाही...अजयला शुद्ध आली..तो पहिला शब्द जो त्याने उच्चारला तो मधुरा हाच होता...मधुरा सुखावली..त्याच्या कपाळावर हलकेच चुंबन घेत ती म्हणाली, ' देवानेच तुला माझ्यासाठी परत आणलेय, माझी साथ कधिही सोडू नकोस...अजय I love you...'  

   अजयला मधुराचा समाधानी चेहरा बघुन हायसं वाटलं..तो हलकेच हसला..तीला जवळ बघून फार सुखावला...

   दोघांचेही आईबाबा आले ..झालेला प्रकार पाहून हळहळले.. अजयची अवस्था बघवत नव्हती..पोलीसांनी प्रथमेश व गुंडांना तुरूंगात डांबले होते..

   मधुराला अजयसाठी रडतांना बघून मधुराच्या आईला सगळा प्रकार लक्षात आला..मधुराने सगळा खुलासा केला..दोन्ही कडची मंडळी लग्नाला तयार होती..अन् थोड्याच दिवसात अजयही बरा झाला..आणि धुमधडाक्यात मधुरा अजयची झाली..लव्ह बर्डस विवाहबंधनात अडकले..

   सगळे म्हणाले,नांदा सौख्य भरे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance