Swarupa Kulkarni

Abstract Others

3  

Swarupa Kulkarni

Abstract Others

ऋणानुबंध

ऋणानुबंध

2 mins
130


    "सरस्वती, ए सरस्वती, आज रखमा शाळेत न्हाई गेली का गं?" धुणं धुता धुता सरस्वती म्हणाली,"राधाक्का, पोरगी मोट्ठी व्हाय लागली. ती जर साळा शिकत बसली तर मला मदत कोन करील?मीच म्हनलं तिला नको जाऊस साळात" राधाक्का बोलल्या, " अगं सरस्वती, पोरगी शिकली तर तिला मोठं ठिकाण मिळल तिचं कल्याण होईल..अशी तिला कामाला जुंपून का तिच्या भविष्याच्या आड येतिस..मी सांगते नं तुला मी भरीन तिची फिज..नको तिचं शिक्षण थांबवूस"...

    सरस्वतीचे डोळे पाण्याने डबडबले.." राधाक्का, तुमचा साऱ्यात जीव..किती करताल म्हायासाठी..माझ्या नवऱ्याला दारूतून सोडिवलं..मोठ्या पोरास नोकरी लावून दिली...येव्हडं आभाळावानी मन तुमचं आक्का..कसं पांग फेडू?" 

   राधाक्का सरस्वतीच्या जवळ आली. तिला म्हणाली, " सरस्वती, अगं, पोटचं पोर नाही मला जीव लावायला..तुझी पोर ती माझी पोर समजते बघ मी...तुझ्या रखमात मला माझीच पोर दिसते बघ.." सरस्वतीने डोळ्याला पदर लावला.राधाक्काचे डोळे डबडबले..

   सारं सावरगाव राधाक्काला तिच्या प्रेमळ स्वभावाने ओळखत होतं. ती होतीच तशी.सावळी, पण देखणी,नाक- डोळे तरतरीत, वय पन्नाशीचं, नवरा फार पुर्वीच गेला..पण तिनं परत लग्न नाही केलं. कारण तिला जवळचं असं कोणीच नव्हतं..आईबापाचं छत्र नाही.पोटी मुलबाळ नाही.पण वाडवडिलांची प्रॉपर्टी मोठी..राहाता चौसोपी मोठा वाडा, घरची शेती , आणि राधाक्काच्या मनमोकळ्या व गप्पिष्ट स्वभावामुळे सारं गाव या राधेला राधाक्का कधी म्हणू लागलं ते कोणालाही कळलं नाही.

    सरस्वती ही तिची मोलकरीण पण जशी घरातलीच एक होऊन गेली.राधाक्का तिला घासातला घास देई.तिच्या रखमालाही ती खूप जीव लावे.वर्षानुवर्षे हे गाव इथली माणसं यांची राधाक्काला व त्या वाड्याला सवयचं होऊन गेली. 

    हळूहळू काळ बदलला.गावपण बदलू लागलं..नवनवीन गोष्टींची भर पडली..रखमाही मोठी होऊन सासरी गेली.तिच्या लग्नात राधाक्काने कन्यादान केलं.पोरगी फार सुंदर दिसत होती लग्नात.राधाक्काने तिला शिकवलं..खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या.रखमाही जड अंतकरणाने गाव सोडून सासरी गेली..राधाक्काला माणसं सोडून जाण्याची सवयच होती..तरीही हिचं जाणं फार लागलं..राधाक्काला सारखी तिची आठवण येई..तिचंही वय आता साठी पार करून पुढे गेलं होतं..आता तिला आधाराची फार फार गरज वाटू लागली..मधून मधुन ती रखमाची चौकशी करत राही..

   मध्ये बराच काळ लोटला..रखमा सासरी गुंतली.पण तिही राधाक्काला कधी विसरू शकली नाही.माहेरी आल्यावर ती आधी राधाक्काची चौकशी करी..आताशा राधाक्का खंगत चालली होती.रखमाचेही लक्ष तिच्याकडेच लागले होते..

   एक दिवस राधाक्का पलंगावर बसली होती..अचानक तिच्या छातीत कळ आली..दुःखावेगाने ती मोठ्याने ओरडली..पण जवळ कोणीच नव्हतं..तीला ती छातीतील कळ सहन न होऊन ती जमिनीवर धाडकन कोसळली...थोड्यावेळाने गर्दी जमली.राधाक्काला दवाखान्यात नेलं गेलं..शेवटचे श्वास घेत ती अंथरूणावर पडून होती.इतक्यात रखमा व सरस्वती गर्दितून पुढे आल्या.रखमाला पाहून राधाक्का शेवटचं बोलली," रखमा..मला पोर झालं नाही.पण मी तूलाच मनातून पोरगी मानलं..आता माझं घर-शेती तुझ्यानावानेच करून ठेवलीये मी..ती तू जीवापाड सांभाळ.."..रखमा ओक्साबोक्शी रडली..राधाक्काने हसत प्राण सोडले..सगळं गाव हळहळलं...राधाक्का गेली..एक अध्याय संपला..

    आणि थोड्याच दिवसात रखमालाही दिवस गेले..तीला माहितच होतं मुलगीच होणार..नी तसंच झालं..राधाच नाव ठेवलं..जन्मली तेंव्हा खूप रडत होती पण नाव ठेवताच शांत झाली.राधाक्काच रखमाच्या पोटी जन्माला आली,सारे बोलले.. राधाक्काची इच्छा अपूर्ण राहिली होती..राधाक्काचे नवे रूप राधा बनुन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जगात आले होते.. *ऋणानुबंध* ...हेच खरं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract