Shubhangi Belgaonkar

Others

4.1  

Shubhangi Belgaonkar

Others

रंग- बंध

रंग- बंध

2 mins
248


मैत्रिणीन बरोबर जेंव्हा जेंव्हा चर्चा व्हायची नवरा कसा हवा याबद्दची तेंव्हा तेंव्हा ही अगदीच वेगळी वाटायची सर्वांना, कारण हीची स्वतःची काही मतं बाकी सर्व मुलींपेक्षा निराळी होती. तिने आयुष्यात सहन केलेल्या दुःखाच्या रंगा पेक्षा अधिक तीव्रतेचा रंग स्पष्टतेचा रंग दाखवणारी. तो काळच होता ३५ वर्षांपूर्वीचा. मुली हळव्या, तरल, साधा, सरळ सोपा विचार करणाऱ्या मुली जेंव्हा सांगायच्या की अंजूला स्टेट बँकेत नोकरी करणारा मुलगा पाहिजे, मंजूला बडोदा बँकेत नोकरी करणारा मुलगा पाहिजे, संजूला महाराष्ट्र बँकेत नोकरी करणारा मुलगा पाहिजे, त्या वेळी ही म्हणायची मला खूप हुशार मुलगा नवरा म्हणुन पाहिजे. त्याच्या हुशारीचा रंग पाहून बँक वाल्यांचे डोळे तेजस्वी रंगाने दिपून गेले पाहिजेत. मुली महणायाच्या ही अशी कशी वेड्या कोकराच्या रंगाची. संसाराचे सात रंग रंगवायला आणि त्यात रंगून जायला बँक बॅलन्स तर हवा. नुसत्या हुशारीने काही संसाराचा रंग थोडीना खुलणार आणि मग बोलणे थांबुन जायचे. कॉलेजमध्ये सगळ्यां मौज-मजेच्या रंगात धुंद असताना अचानक बातमी आली की हीचे लग्न झाले आणि साऱ्याजणी अवाक झाल्या. कोणी नाराजीचे रंग दाखविले तर कोणी उपहसाचे रंग दाखविले तर कोणी वेदनेचे रंग, तर कोणी कुतूहलाने हिला चेष्टेचा विषय बनविले. हीने मात्र ह्या कशाची पर्वा न करता शिक्षण आणि संसार, नातेवाईक, समाज, सासू-सासरे, एकत्र कुटुंबात राहायच्या स्वप्नांच्या रंगात स्व:तहाला झोकून दिले आणि ह्या सर्वात तिच्या हुशारीच्या रंगाने, म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला छान साथ दिली असे तिला वाटले आणि त्या खुशीच्या रंगात ती रंगून गेली. 

रोज रोज १७ ते १८ तास काम करायची ती. स्वच्छ्ता, टापटीप, आला-गेला, पै-पाहुणा यामध्ये अगदी गुंतुन गेली. स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदाचा रंग जपण्यात तिला नेहेमीच जीवन सार्थकी लागले असे वाटायचे. काही वर्षातच त्यांचा संसार प्रगतीच्या मोठ्या वाटेवर येवून ठेपला. आता ती कोणाची आवडती काकू, आवडती मामी, आवडती आत्या, आवडती वहिनी, आवडती आज्जी सुद्धा झाली आणि धन्यतेच्या रंगात गर्क झाली. मैत्रीणीना आता तिचा खूप हेवा वाटायला लागला. बँकेतून त्यांचे नवरे रात्री ९ वाजता यायचे त्या वेळा हिचे सारे काही आवरून ही छान फिरायची, टीव्ही बघायची. आता त्यांना पटायला लागले हुशारीचा रंग जास्तच जोरात चालतो, म्हणून सुपर वुमेन होण्याच्या नादात तिच्या हे लक्षातच आले नाही की स्वतःचा आरोग्याचा रंग बिघडायला लागला आहे आणि ज्याच्या हुशारीच्या रंगावर तिचा अभिमानाचा रंग बहरून येत होता, त्याच्या गरजेचा रंग बदलून गेला आहे आणि त्याठिकाणी बेपरवाईचा रंग ठळक झाला आहे. पदोपदी ती विचार करू लागली की ह्याच्या हुशरीचा रंग बहरून यावा म्हणून मी माझा छंद, माझी कविता, माझे गाणे, माझे नृत्य, माझे कथाकथन, माझे पोस्टर्स, माझे वादन, माझे सप्तरंग बाजूला ठेवले आणि ह्याच्या रंगात स्वतःला रंगवून टाकले पण मग मला काय मिळाले? क्षणात तिच्या पापण्या ओलावल्या. त्या ओलेत्या रंगाला तिने बाजूला सारले आणि तिच्या दोन्ही मुलांच्या कर्तृत्वाच्या रंगात झोकुन देवून बेपर्वाईच्या रंगावर मात करण्यासाठी सज्ज झाली.


Rate this content
Log in