सैनिक
सैनिक
1 min
272
देशाचे रक्षणकर्ता तुम्ही
आम्हाला तुमचा अभिमान ।
मातृभूमीचे रक्षक तुम्ही
तुम्हाला आमचा सलाम।
सीमेवर तूम्ही असता म्हणून
आम्ही शांततेत झोपतो ।
रक्षण करण्या या देशाचे
प्रत्येक सैनिक सज्ज असतो।
ऊन, वारा, पाऊस, थंडी
कसलेच नसते भान ।
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त
वंदे मातरम, सोडला जरी प्राण।