Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

2  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

आज कुछ अच्छा हो जाये

आज कुछ अच्छा हो जाये

3 mins
646


निवांत सुट्टीच्या दिवशी पडलो असताना अचानक एक कॉल आला..

काहीशा त्रागाने फोन उचलला तर पलीकडून एक माझी नेहमीची त्रस्त मैत्रीण बोलेलेली दिसली😊😊..


हॅलो, अरे सँडी मला तुझ्याशी भेटायचं आहे .वेळ आहे का??


आता रविवारी आपण मस्त मूड मध्ये असतो, दिवसभर काय काय प्लॅनिंग ठरलेले असते.. कोणाची भेट तर काही खायचं प्रोग्राम..😊त्यात काही अपूर्ण राहिलेले छंद जोपासायच.. अन हे सगळं करता करता रविवार कसा निघून जातो कळत नाही.. अन परत ही व्यक्ती म्हणतेय तुम्हाला वेळ आहे का आज??


काहीशा अनिश्चेतेने मी म्हणालो

सॉरी काव्या आज नाही वेळ .नंतर भेटु. पण तुझं काम सांग मी जमेल तसे करायचा प्रयत्न करेन..


सॉरी ,पण तू मला भेटल्यावर सांगेन अन तु पण मला प्रत्यक्ष आला तरच मदत करू शकताल..


आता मला खूप अवघड फिल झालं..


एकतर ती व्यक्ती माझी खूप जवळची आहे असं ही नव्हतं, अन आज रविवार. परत आजकाल खूप ऐकलेलं की, काही जण असे इमोशनल मेसेज करून जाळ्यात अडकवून ठेवतात वैगेरे..


मी स्पष्ट नकार देणार इतक्यात तिच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला.. बाबा आले की नाही😢मला बाबा हवे 😢😢


हे प्रकरण काहीसे वेगळेच आहे याचा अंदाज आलेला मला..

 तू कुठं राहतेस सांग?


तिने पत्ता सांगितला...


काहीसा विचार करून मी निघालो.सोबत एक मित्राला फोन केला अन तिने दिलेल्या पत्त्यावर यायला त्याला सांगितलं..

पत्ता हुडकत जसा जवळ आलो तसे एक हायस वाटलं.मित्र ही आलेला. त्याला तोपर्यंत सगळं तुटक तुटक सांगितले.. अन आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घराची बेल दाबली..


ओहह थँक्स... आलात तुम्ही..


तिने तडक तिच्या मुली कडे आमचा मोर्चा वळवला...

पाहतो तर ती बिचारी मुलगी, असेल सात आठ वर्षांची, पण रडून रडून डोळे सुजलेले..


बाबा, बाबा. .😊

एकदम मला बिलगली ना...


मी क्षणभर अवाकच. 


पण लगेच सावरलो अन तिला कवेत घेतलं. तिने माझे पापी घेतल्या..तिला माझा स्पर्श तिच्या बाबांचा समजून एवढा आवडला की, ती थकून लगेच झोपून गेली...


आता दुसरा पार्ट सुरू झालेला ..


अरे हे काय काव्या ?अन तु मला असे अचानक बोलावलं ?आपण पहिल्यांदा भेटतोय अन ते ही असे?सिन काय ?समजलं नाही यार??


सांगते सर्व...


तिने एक पोझ घेतली अन सुरू केलं..


मी अन अमित. दोघाचं आमचं लग्न झालं ते ही विरोधात..आम्ही बंगलोर त शिफ्ट झालो अन काही दिवसात अमित ला बॉर्डर वर जावं लागलं. एक वर्ष तो तिथं होता. परत आला तर मला सदिच्छा झालेली.अमित चे हे असे नेहमीच् व्व्हायचं. सदिच्छा लहानाची मोठी होत गेली पण तिला बापाचं सुख काही नशिबी नव्हतं.. सदिच्छा ने अमित ला पाहिलेला पण खूप धूसर.. कारण ती लहान असताना तिला डोळ्यात रेटिना वाढलेला.. ती माणसे ओळखू शकणार नाही असे डॉक्टर ने सांगितलं😢


मला हा खूपच मोठा धक्का होता. पण मी सावरले अन सदिच्छा ला मोठं केलं..

पण मागच्या वर्षी आमच्या संसाराला ग्रहण लागलं.. अमित एका दहशतवादी हल्ल्यात बळी पडले अन सगळंच संपलं😢😢😢.

मी कसतरी सावरले अन सदिच्छा ला ही जाणवू दिल नाहीच..


पण काल ती खूपच रडू लागली..😢😢

मला बाबा हवा ,मला बाबा हवा..

रडून रडून डोळे सुजवले, माझी अन तिची सगळी रात्र त्यात गेली. अन मग तु आठवला मला..


मी फारसा विचार न करता तुला कॉल केला..आता तुला अमित च्या जागी बोलावून मी सदिच्छा ला शांत करायचं ठरवलं.. तु आलास अन ती शांत झाली.. खूप थँक्स रे.. हे उपकार नाही विसरू शकत मी😢😢..


मी इकडे खूप सुन्न.. पण बाहेर पडताना मात्र एक आत्मिक समाधान उगाच झळकत असल्याचा भास झाला मला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational