चंद्र पाहिला...
चंद्र पाहिला...
चंद्र पाहिला मी ,उतरला जो अंगणात,
हा भास तोच होता, की स्वप्न तेच होते...
सुगंध श्वासात भरता, उरला तो मोगऱ्यात,
मृदुगंध तोच पापणीला, की स्वप्न तेच होते...
ते हळुच पहाणे , पाहूण मज लाजणे क्षणात ,
क्षण बहरून गेला, की स्वप्न तेच होते...
ओझरते तुला पाहण्या, प्रतिबींब आरशात,
आरसा संमोहित झाला, की स्वप्न तेच होते...
मन वेडावुन गेली, की प्रेमात वेड होते ,
क्षणात लावणारे वेड , हे स्वप्न तेच होते...